Rashmi Mane
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नुकताच नागरी सेवा परीक्षा 2024 चा अंतिम निकाल जाहीर केला.
या परीक्षेत शक्ती दुबे यांनी पहिला क्रमांक मिळवला असून हर्षिता गोयलने दुसरे आणि अर्चित डोंगरेने तिसरे स्थान पटकावले आहे.
आता लोकांच्या मनात हा प्रश्न नक्कीच येईल की या उमेदवारांना कुठे प्रशिक्षण दिले जाते आणि या काळात त्यांना किती पगार मिळतो?
यूपीएससी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या सर्व उमेदवारांना सुरुवातीला LBSNAA येथे प्रशिक्षण दिले जाते.
मसुरी येथे स्थित लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी (LBSNAA) ची स्थापना 1959 मध्ये झाली.
LBSNAA कडून एक वर्षाचे शैक्षणिक आणि एक वर्षाचे प्रशिक्षण घेतल्यास जेएनयू मधून सार्वजनिक व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी मिळते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, LBSNAA मध्ये प्रशिक्षणादरम्यान, दरमहा 56,100 रुपये स्टायपेंड दिले जातात.