Rashmi Mane
बरेच लोक आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं करायचं ठरवतात आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी कष्ट करायलाही तयार असतात.
पण जेव्हा लोक आयुष्यात दोन-तीन वेळा अपयशी होतात, तेव्हा आयुष्यात निराशा येते.
हरयाणाचे रहिवासी असलेले विजय वर्धन यांचे शालेय शिक्षण सिरसा येथून झाले, त्यानंतर त्यांनी हिसार येथून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगमध्ये बीटेक केले.
B.Tech नंतर विजय यांनी UPSC ची परीक्षा देण्याचे ठरवले, UPSC ची तयारी करण्यासाठी ते दिल्लीला गेले.
'यूपीएससी'ला बसण्यापूर्वी ते ३० स्पर्धा परीक्षांमध्ये पराभूत झाले. वर्धन यांनी हरयाणा पीसीएस, यूपी पीसीएस, एसएससी सीजीएल सारख्या 30 स्पर्धात्मक परीक्षा दिल्या, परंतु त्यापैकी एकाही परीक्षेत त्यांना यश मिळाले नाही.
विजय वर्धन यांनी 2014 मध्ये पहिल्यांदा UPSC परीक्षा दिली. पण इथेही त्यांना अपयशचा सामना करावा लागला. पण त्यांच्या धैर्याने त्यांचा आत्मविश्वास डगमगू दिला नाही.
2018 मध्ये, त्यांच्या अथक परिश्रमाचे फळ त्यांना मिळाले आणि UPSC मध्ये 104 रँक मिळवत 'आयपीएस' अधिकारी बनले. परंतु त्यांना 'आयएएस' पद खुणावत होते. म्हणून त्यांनी 2021 मध्ये पुन्हा यूपीएससी परीक्षा दिली आणि 'आयएएस' अधिकारी बनले.