सरकारनामा ब्यूरो
झारखंड जिल्ह्यातील बोकारो येथे चोरीची धक्कादायक घटना घडली आहे. ही चोरी चक्क जिल्ह्याच्या उपायुक्त विजया जाधव यांच्या घरी झाली आहे.
चोरी झालेल्या घटनेत विजया जाधव यांचे सरकारी आवास योजनेचे एकूण 95 हजार रुपयांची रोख रक्कम,सोन्यांची अंगठी, हार आणि डायमंडच्या कानातल्यासह आणखी किमती वस्तूंचा समावेश आहे.
सध्या या प्रकरणाचा पोलिस तपास करत असून या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. तर जाणून घेऊयात विजया जाधव यांच्याबद्दल.
महाराष्ट्राच्या रहिवासी असलेल्या विजया नारायणराव जाधव 2015 च्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत.
त्यांची पहिली नियुक्ती झारखंडच्या गिरिडीहमध्ये अनुमंडल पदाधिकारी (एसडीएम) म्हणून करण्यात आली होती.
झारखंड जिल्ह्यातील सिंहभूम (जमशेदपूर) च्या उपायुक्त, नगरविकास आणि गृहनिर्माण विभागात संचालक म्हणून विजया जाधव यांनी काम केले आहे.
सध्या त्या बोकारो जिल्ह्याच्या उपायुक्त अधिकारी आहेत. त्यांनी ग्रामीण भागात अनेक योजनांची योग्य अंमलबजावणी करून शहरी आणि ग्रामीण भागात स्वच्छता आणि सुनिश्चित ठेवण्याचे मोलाचे काम केले आहे.