Aslam Shanedivan
केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण मंत्रालयाने पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे नवीन आदेश जारी केले. ज्यामध्ये मध्य प्रदेश केडरच्या दोघांचा समावेश आहे
आकाश त्रिपाठी आणि फैज अहमद किडवई यांच्यासह रुही खान यांचा समावेश आहे. त्रिपाठी आणि किडवई यांना नवी जबाबदारी देण्यात आली आहे.
1996 च्या बॅचचे IAS अधिकारी फैज अहमद किडवई यांना नागरी उड्डाण मंत्रालयाच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयात महासंचालक बनवण्यात आले आहे.
गृह मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आशुतोष अग्निहोत्री यांना भारतीय अन्न महामंडळाचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे.
तर 1998 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आकाश त्रिपाठी यांना ऊर्जा विभागातील अतिरिक्त सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
तसेच 2013 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी रुही खान यांना राज्य प्रशासकीय सेवेतून आयएएस पदावर बढती मिळाली असून त्या मध्य प्रदेशात परतणार आहेत.
सध्या त्या दिल्लीत आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयात उपसचिव म्हणून कार्यरत आहेत.