सरकारनामा ब्यूरो
पुण्याच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती झालेले जितेंद्र डुडी हे भारतीय प्रशासकीय सेवेतील 2016 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत.ते मुळचे राजस्थान येथील असून IAS परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना झारखंड केडर मिळाले होते.
पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचा विवाह IPS आंचल दलाल यांच्याशी झाला.
आंचल दलाल या IPS असून त्या पुणे जिल्ह्यातील राज्य राखीव दलात (एसआरपीएफ) कार्यरत आहेत.
आंचल या मूळचा उत्तर प्रदेशामधील शामली जिल्ह्यातील आहेत.पण त्या गाझियाबाद जिल्ह्यात त्यांच्या कुटुंबासह राहत होत्या.
L.L.Bचे शिक्षण
त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले आहे.त्याचा फायदा त्यांना UPSC च्या परीक्षेत झाला.
आयपीएस म्हणून निवड होण्यापूर्वी त्या नागपुर येथे भारतीय रेल्वेमध्ये कार्यरत होत्या.
आंचल यांनी सर्वोत्कृष्ट लेडी आउटडोर प्रोबेशनर साठी 1958 बॅच आयपीएस ऑफिसर ट्रॉफी जिंकली.