सरकारनामा ब्यूरो
भारतीय प्रशासकीय सेवेतील सतत चर्चेत असलेल्या IAS अधिकारी परी बिश्नोई आई झाल्या आहेत.
25 फेब्रुवारी 2025 रोजी परी बिश्नोई यांनी एका मुलीला जन्म दिला. याची महिती त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून दिली.
IAS परी आणि भव्य बिश्नोई यांनी त्यांच्या मुलीच्या नाव 'वेदा' असे ठेवले आहे.
परी यांनी मुलीच्या नाव वेदा ठेवून तरुणांना संदेश दिला आहे की, आपण कितीही मोठे झालो तरी आपली संस्कृती आणि धर्माची नाळ तुटता कामा नये.
परी बिश्नोई यांनी हरियाणातील माजी भाजप नेते कुलदीप बिश्नोई यांचे सुपुत्र भव्य बिश्नोई यांच्याबरोबर उदयपूर येथे विवाह केला होता.
IAS परी बिश्नोई ज्यांनी आपल्या प्रचंड मेहनतीच्या बळावर UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांना आपले भविष्य नागरी सेवेतच घडवायचे होते आणि म्हणून त्यांनी परीक्षेची तयारी केली.
परी बिश्नोई यांनी 2019 मध्ये, तिसऱ्या प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि 30 वा क्रमांक मिळवत त्या IAS अधिकारी झाल्या.
परी बिश्नोई या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. त्या नेहमी आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करतात.