Rashmi Mane
UPSC परीक्षेत पास होण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते पण काही निवडक लोकच पास होऊ शकतात.
त्यामधीलच एक आहेत IAS परी बिश्नोई ज्यांनी आपल्या प्रचंड मेहनतीच्या बळावर भारतातील सर्वात कठीण समजली जाणारी UPSC परीक्षा उत्तीर्ण केली.
अजमेरच्या रहिवासी असणाऱ्या परी बिश्नोई आपल्या यशाचं श्रेय त्यांच्या आई-वडीलांना देतात.
नुकतच त्यांचा विवाह हरियाणा राज्याचे माजी मुख्यमंत्री चौधरी भजनलाल यांचे नातू भव्य बिश्नोई यांच्याशी झाला.
परी बिश्नोई यांचे शालेय शिक्षण अजमेर येथील सेंट मेरी कॉन्व्हेंट स्कूलमधून झालंय.
परी बिश्नोई यांनी दिल्ली विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण केल आहे. पदवीनंतर त्यांनी अजमेरच्या एमडीएस विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले.
ग्रॅज्युएशन करत असतांनाच त्यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरु केली.
परी बिश्नोई यांनी 2019 मध्ये, तिसऱ्या प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि 30 वा क्रमांक मिळविला.