Rashmi Mane
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, केरळच्या आयएएस कपल बद्दल एक अनोखी गोष्टी.
सध्या केरळचे पॉवर कपल शारदा मुरलीधरन आणि डॉ. व्ही वेणू यांची देशभर चर्चा होत आहे. चला जाणून घेऊया या जोडीबद्दल...
केरळचे पॉवर कपल डॉ. वेणू आणि शारदा मुरलीधरन हे 1990 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
सध्या शारदा मुरलीधरन या स्थानिक स्वराज्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवाची जबाबदारी सांभाळत आहेत. 2006 ते 2012 या सहा वर्षांसाठी त्यांनी राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी गरीबी निर्मूलन कार्यक्रम कुटुंबश्री मिशनचे नेतृत्व केले आहे.
याशिवाय महिला सक्षमीकरणाशी संबंधित अनेक योजनांची जबाबदारीही त्यांनी पार पाडली आहे. IAS शारदा मुरलीधरन यांनीही केंद्र सरकारमध्ये काम केले आहे. 2013 मध्ये त्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर आल्या होत्या.
या काळात त्यांनी ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानात मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी पुढील दोन वर्षे पंचायती राज मंत्रालयात सहसचिव म्हणून काम केले.
आयएएस डॉ. व्ही वेणू हे कोझिकोडचे रहिवासी आहेत. त्यांचे शालेय शिक्षण कोझिकोड येथील केंद्रीय विद्यालयातून झाले.
त्यानंतर मलबार ख्रिश्चन कॉलेजमधून एमबीबीएसची पदवी घेतली. डॉ. व्ही वेणू यांची पहिली पोस्टिंग त्रिशूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून झाली होती.
सध्याचे केरळचे मुख्य सचिव डॉ.वेणू हे 31 ऑगस्ट रोजी निवृत्त होत आहेत. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केरळ सरकारने शारदा यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.