Rashmi Mane
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील डेमोक्रॅटिक उमेदवाराची अधिकृत घोषणा करण्यासाठी 'डेमोक्रॅटिक नॅशनल कन्व्हेन्शन' (DNC) बुधवारी सुरू झाले
डेमोक्रॅटिक नॅशनल कन्व्हेन्शनच्या तिसऱ्या दिवशी अचानक स्टेजवर वैदिक मंत्रोच्चार सुरू झाले.
कपाळावर टिळक लावून धोतर आणि कुर्ता घालून पंडित मंचावर आले तेव्हा त्यांनी संस्कृतमधील मंत्र पठण सुरू केले. यावेळी तेथे उपस्थित असलेले सर्व अमेरिकन लोक थक्क झाले.
मेरीलँड येथील श्री शिव विष्णू मंदिराचे पुजारी पंडित राकेश भट्ट हे मूळचे बेंगळुरूचे रहिवासी आहेत.
यावेळी राकेश भट्ट म्हणाले, संपूर्ण विश्व हे एक कुटुंब आहे. सत्य हा आपला पाया आहे आणि तो शाश्वतही आहे. आपण असत्याकडून सत्याकडे, अंधारातून प्रकाशाकडे आणि मृत्यूकडून अमरत्वाकडे नेण्यासाठी देवाला प्रार्थना करतो. ओम शांती शांती शांती.
पं. राकेश भट्ट यांनी संस्कृतचे शिक्षण जयचमराजेंद्र कॉलेज आणि ऑस्टिन कॉलेज, बेंगळुरू येथून घेतले. येथे त्यांनी कन्नड आणि इंग्रजीमध्ये शिक्षण घेतले.
त्यांच्या शैक्षणिक कामगिरीमुळे त्यांना मंत्रालय, उत्तरादी मठ आणि उडुपी अष्ट मठ यांसारख्या संस्थांकडून शास्त्र विद्वान पुरस्कार मिळाला आहे.