सरकारनामा ब्यूरो
IAS प्रांजल यादव यांची नेमणूक पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकास विभागाच्या सचिवपदी करण्यात आली आहे जाणून घ्या..
2006 च्या बॅचचे IAS अधिकारी असलेले प्रांजल यादव हे उत्तर प्रदेशात पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकास विभागाच्या सचिवपदी कार्यरत आहेत.
प्राजंल सध्या सध्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई), निर्यात प्रोत्साहन, हातमाग आणि वस्त्रोद्योग, खादी आणि ग्रामोद्योग तसेच आयडीसी विभागांमध्ये सचिवापदाचा कार्यभार सांभळला आहे
प्रांजल यांनी आयआयटी रुर्की येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेकची पदवी प्राप्त केली..यानंतर UPSC परीक्षा उत्तीर्ण ते IAS अधिकारी बनले.
जून 2007 ला त्यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून केली.
काही वर्षानंतर प्रांजल यांचे सिद्धार्थ नगर उपविभागात सह जिल्हाधिकारी म्हणून स्थलांतरित झाले.त्यानंतर महाराजगंज आणि आझमगड जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी म्हणूनही कार्यभार सांभळला आहे.
2013 ला झाशी येथे नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी अनेक विकास कामे करत आपल्या कामाची छाप सोडली.
वाराणसीतील रस्ते सुधारणे, शहरातील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी सोडवणे,रस्ते रुंदीकरणाचे काम,रस्त्यावर बेकायदेशीरित्या वाहतूक चालणाऱ्याविरोधी कारवाया केली. यासाठी त्यांचे खूप कौतुक होत आहे.