IAS Prashant Sharma : IAS नियुक्तीतही घराणेशाही? सासू IAS, सासरे निवृत्त, जावयाची नियम डावलून पोस्टिंगचा आरोप

Rajanand More

IAS प्रशांत शर्मा

IAS प्रशांत शर्मा हे उत्तर प्रदेशातील धडाकेबाज अधिकारी म्हणून परिचित आहेत. त्यामुळे त्यांच्या बदलीची, नियुक्तीची नेहमीच चर्चा असते.  

IAS Prashant Sharma | Sarkarnama

फूड कॉर्पोरेशनमध्ये बदली

शर्मा यांची नुकतीच फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या विभागीय महाव्यवस्थापकपदी बदली झाली आहे. त्यावरून घराणेशाही आणि त्यांना झुकते माप दिले जात असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

IAS Prashant Sharma with family | Sarkarnama

नियम डावलला?

ही नियुक्ती करताना नियम डावलण्यात आल्याचा आरोप होतोय. या पदासाठी 14 वर्षांचा अनुभव अपेक्षित आहे. शर्मा हे 2012 च्या तुकडीचे अधिकारी असल्याने त्यांचा अनुभव 13 वर्षांचाच आहे.

IAS Prashant Sharma | Sarkarnama

सासूही IAS

प्रशांत शर्मा यांच्या सासूही यूपी सरकारमध्ये उच्च पदावर आहेत. त्या 1989 च्या तुकडीच्या आयएएस अधिकारी आहेत. तर सासरे प्रदीप शुक्ला हे निवृत्त IAS अधिकारी आहेत.

IAS Prashant Sharma | Sarkarnama

सासऱ्यांना अटक

शर्मा यांच्या सासऱ्यांना 2012 मध्ये अटक करण्यात आली होती. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनमध्ये घोटाळ्याचा त्यांच्यावर आरोप होता.

IAS Prashant Sharma with Wife | Sarkarnama

शर्माही वादात

अमेठीचे जिल्हाधिकारी असताना शर्माही वादात अडकले होते. भाजप कार्यकर्त्याच्या भावासोबतच्या त्यांच्या वागणुकीमुळे वाद निर्माण झाला होता.

IAS Prashant Sharma with Wife | Sarkarnama

बदलीमुळे चर्चेत

शर्मा यांची मोठ्या पदावर बदली करण्यात आल्याने उत्तर प्रदेशातील प्रशासनात लॉबिंगच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

IAS Prashant Sharma | Sarkarnama

कोरोना काळात समाजकार्य

कोरोना काळामध्ये शर्मा व त्यांच्या पत्नी एक वेबसाईट सुरू केली होती. या वेबसाईटच्या माध्यमातून त्यांनी आजाराविषयी जनजागृती करण्याचे काम केले होते. तेव्हापासून ते आणखी प्रकाशझोतात आले होते.

IAS Prashant Sharma with Wife | Sarkarnama

NEXT : ...म्हणून संयुक्त राष्ट्रांच्या महासभेकडून 24 मार्च 'सत्याच्या अधिकारासाठी आंतरराष्ट्रीय दिवस' म्हणून घोषणा

येथे क्लिक करा.