सरकारनामा ब्यूरो
बिहारमधून उत्तर प्रदेश केडरमध्ये बदली झाल्यामुळे चर्चेत आलेल्या IAS प्रतिक्षा सिंह यांचा संघर्षमय प्रवास.
प्रतिक्षा सिंह यांचा IAS होण्याचा प्रवास यूपीतील प्रयागराज येथून सुरू झाला. त्यांचे कुटुंब साहिबाबाद येथे राहत होते. त्याचे वडील शिक्षक आणि आई गृहिणी आहे.
त्यांचे लहानपणापासून प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न होते. 2019 ला त्यांने पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर UPSC परीक्षेची तयारी सुरू केली.
2020 ला त्यांनी पहिला प्रयत्न केला होता, यात त्यांनी प्रिलिम्स आणि मेन्स उत्तीर्ण केले पण मुलाखतीत अपयश आले. 2021मध्ये दुसऱ्या प्रयत्नातही अपयश. घरापासून दूर राहणे, खाण्यापिण्याचे हाल अशा खडतर परिस्थितीतही त्यांनी हार मानली नाही.
त्यांनी UPPSC PCS परीक्षा उत्तीर्ण केली. संपूर्ण भारतातून 7वा रँक मिळवत त्यांनी उपजिल्हाधिकारी पद मिळवले.
एसडीएमच्या जबाबदाऱ्यांसोबत त्यांनी UPSC ची तयारीही सुरू ठेवली. 2022 ला त्यांनी 52 व्या क्रमांकासह UPSC परीक्षा उत्तीर्ण केली.
2024 ला त्यांची पहिली नियुक्ती बिहारमधील बक्सर जिल्ह्यात प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून झाली.
यानंतर त्यांनी उत्तर प्रदेश केडरमध्ये बदलीची मागणी केली, जी बऱ्याचं दिवसानंतर मान्य करण्यात आली. यामागे कारण म्हणजे त्यांचे पती उत्तर प्रदेश केडरमध्ये आयपीएस आहेत.