सरकारनामा ब्यूरो
रेखा गुप्ता यांनी आज दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील रहिवासी असलेले पंकज सिंह यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
पंकज सिंह यांच्या आईचे काल (बुधवारी) निधन झाले. आईची आठवणीने भावूक झालेले पंकज सिंह यांनी आज (गुरुवारी) मंत्रिपदाची शपथ घेतली.
पंकज हे मूळचे दिल्ली येथील विकासपूरचे रहिवासी आहेत. त्यांचे वडील राज मोहन सिंग हे एमसीडीमध्ये अतिरिक्त आयुक्त होते.
पंकज यांनी मगध विद्यापीठातून 1998 मध्ये बीडीएस पदवी प्राप्त केली आहे. यानंतर त्यांनी डेंटिस्ट म्हणून नोकरी केली.
पंकज यांनी त्यांच्या राजकीय करियरची सुरुवात MCD येथून नगरसेवक म्हणून केली होती.
पहिल्यांदाच दिल्लीच्या विकासपुरी विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडून येत ते आमदार झाले होते.
विकासपुरीच्या विधानसभा निवडणूकीत पंकज यांनी आम आदमी पक्षाचे महेंद्र यादव यांचा 12,876 मताने पराभव केला.
दिल्लीत भाजपच्या विजयात पूर्वेकडील लोकांचा मोठा वाटा आहे यामुळे भाजप पक्षाला येथील लोकांना सोडायचे नव्हते. बिहारमधील बक्सर येथून शपथ घेणारे पंकज कुमार हे पहिलेच आमदार आहेत.