Rashmi Mane
देशात अनेक 'आयएएस' अधिकारी आहेत ज्यांचा सोशल मीडियावर चांगलाच बोलबाला आहे. यापैकी एक नाव म्हणजे आयएएस अधिकारी प्रिया राणी.
प्रिया राणीची आयएएस अधिकारी बनण्याची गोष्ट प्रचंड प्रेरणादायी आहे.
एका छोट्या गावात राहणाऱ्या प्रियाच्या शिक्षणासाठी सुरुवातीला विरोध झाला होता, पण आजोबांच्या पाठिंब्याने आणि मेहनतीने ती आज 'आयएएस' अधिकारी बनली.
20 वर्षांपूर्वी आजोबांनी तिला पाटण्याला शिक्षणासाठी पाठवले. प्रियाने अतिशय संघर्षाने आणि मेहनतीने पाटणा येथे भाड्याच्या घरात राहून आपले शिक्षण पूर्ण केले.
प्रिया राणीने बीआयटी' मेसरा येथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केल्यानंतर यूपीएससीची तयारी सुरू केली.
यूपीएससीच्या दुसऱ्या प्रयत्नात त्यांना इंडियन डिफेंस सर्विसमध्ये काम करण्याची संधी मिळाली, पण आयएएस होण्याचे त्यांचे स्वप्न त्यांना शांत बसू देत नव्हते.
त्यांनी पुन्हा तिसऱ्यांदा परीक्षा दिली. पण त्यांना या प्रयत्नातही अपयश आले.
मात्र, खचून न जाता त्यांनी पुन्हा अभ्यास सुरु केला. अन् चौथ्या प्रयत्नात यश संपादन करत प्रिया राणीने यूपीएससी परीक्षेत 69 वा क्रमांक पटकावला.