Rashmi Mane
1 जानेवारीला संपूर्ण जगभरात नववर्ष साजरे केले जाते. पण असा एक देश आहे ज्या देशात एक, दोन नाही तर तब्बल वर्षातून 5 वेळा साजरे केले जाते नवीन वर्ष.
हा दुसरा कोणता देश नाही तर भारतातच नवीन वर्ष वर्षातून पाच वेळा साजरे केले जाते. चला बघूया कसं ते.
हिंदू कॅलेंडरनुसार, चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदा हे नवीन वर्ष म्हणून साजरे केले जाते कारण हिंदू कॅलेंडरमध्ये चैत्र हा वर्षाचा पहिला महिना आहे आणि शुक्ल प्रतिपदा ही पहिली तारीख मानली जाते. महाराष्ट्रात गुढी पाडव्याला नववर्ष साजरे केले जाते.
ज्याप्रमाणे चैत्र शुक्ल प्रतिपदा ही हिंदू नववर्षाची सुरुवात मानली जाते, त्याचप्रमाणे इस्लाममध्ये नवीन वर्षाची सुरुवात मोहरम महिन्याच्या पहिल्या तारखेला होते, ती हिजरी दिनदर्शिकेची सुरुवात मानली जाते.
शीख धर्मात नवीन वर्षाची सुरुवात बैसाखीपासून होते. शिखांच्या नानकशाही कॅलेंडरनुसार, नवीन वर्ष दरवर्षी 13 किंवा 14 एप्रिल रोजी साजरे केले जाते. असे मानले जाते की या दिवशी 10 वे शीख गुरु गोविंद सिंग यांनी खालसा पंथाची स्थापना केली होती.
पारशी धर्मात नवीन वर्ष नवरोज म्हणून साजरे केले जाते. ही परंपरा सुमारे तीन हजार वर्षे जुनी आहे. याची सुरुवात पर्शियन राजा जमशेद याने केली होती. त्याला जमशेद-ए-नौरोज असेही म्हटले जाते. कारण त्याने पारशी दिनदर्शिका सुरू केली.
ख्रिश्चन धर्मात नवीन वर्ष 1 जानेवारीला साजरे केले जाते. केवळ भारतातच नाही तर जगातील बहुतांश देशांमध्ये 1 जानेवारीला नववर्ष साजरे केले जाते.