सरकारनामा ब्यूरो
घरची परिस्थिती प्रचंड हलाखीची असूनही 'यूपीएससी' ची परीक्षा पास करत आपलं IAS होण्याचं स्वप्न पूर्ण करणारी रैना जमील...
रैना जमील या 2019 बॅचच्या छत्तीसगढ केडरचे अधिकारी आहेत.
या झारखंडमधील धनाबाद येथील राहणारी असून त्यांचे वडील मोहम्मद जमील अन्सारी हे टाटा स्टील कंपनीमध्ये मॅकेनिकलचं काम करत होते. तर आई नसीम आरा या आठवी पास गृहिणी असल्याने त्यांनी मुलांच्या शिक्षणाला खूप महत्त्व दिले.
यांचा शिक्षण आठवीपर्यत छाताबादमधील उर्दू शाळेत झालं. 10 वी आणि 12 पर्यतच शिक्षण हे सरकारी शाळेतून पूर्ण केलं. गावापासून त्यांचं काॅलेज हे 50 किलोमीटर लांब असल्याने त्यांना काहीवेळेला बस न मिळाल्याने पायी प्रवास करावा लागत होता.
बीएससी केली, त्यानंतर रैना यांनी एमएससी करत पूर्ण काॅलेज मध्ये 75% टक्क्याने टाॅप केलं. आणि 2014 मध्ये त्यांनी UPSC ची परीक्षा देण्याचं ठरवलं. तिसऱ्या प्रयत्नांत 882 रँक मिळवत त्या पास झाल्या.
UPSC च्या परीक्षेची तयारी सुरू ठेवत त्या चौथ्या प्रयत्नांत 388 वा रँक मिळवत त्या पास झाल्या. 2019 मध्ये त्यांची निवड आयएएस या पदासाठी करण्यात आली.
2019 मध्ये छत्तीसगड जांजगीर चंपा येथील एक मुलगा उघड्या खड्यात पडला होता. त्याला वाचवण्याचं रेस्क्यू ऑपरेशन 105 तास चालू होतं. यामध्ये रैना जमील यांचाही समावेश होता.
रैना या सध्या झारखंडमधील रांची येथे IAS अधीकारी आहेत.