Rashmi Mane
UPSC ही देशातील सर्वात अवघड परीक्षा मानली जाते. अनेक जण वर्षानुवर्षे तयारी करूनही यशस्वी होत नाहीत. मात्र, काहीजण पहिल्याच प्रयत्नात मेहनतीच्या जोरावर टॉप करतात.
IAS रेनू राजने डॉक्टरी सोडून UPSC कडे वळाले. कठोर परिश्रमाच्या जोरावर 2014 मध्ये पहिल्याच प्रयत्नात देशात टॉप केले.
1987 मध्ये जन्मलेली रेनू केरळच्या कोट्टायम येथील आहेत. वडील बस कंडक्टर, आई गृहिणी. आर्थिक परिस्थिती साधी होती, पण आई-वडिलांनी मुलीच्या शिक्षणात कधीही अडथळा येऊ दिला नाही.
रेनूने कोट्टायमच्या सेंट टेरेसा हायस्कूलमधून शिक्षण घेतले. त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून MBBS पदवी पूर्ण केली. पुढे कोल्लम जिल्ह्यातील ASI हॉस्पिटलमध्ये हाउस सर्जन म्हणून काम केले.
डॉक्टरीसोबत UPSC ची तयारी सुरू ठेवत रेनूने 2014 मध्ये UPSC परिक्षा दिली. पहिल्याच अटेम्प्टमध्ये दुसरी रँक मिळवत मोठे यश मिळवले.
रेनू म्हणाल्या – “डॉक्टर म्हणून मी शंभर रुग्णांना मदत करू शकले असते. पण IAS अधिकारी म्हणून हजारो लोकांचे आयुष्य बदलवू शकते.”
UPSC तयारीसाठी रेनू रोज 6 ते 8 तास अभ्यास करत. आहार, झोप आणि एकाग्रतेला विशेष महत्व दिले. प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीसाठी एकत्रित तयारी केली आहे.
बस कंडक्टरची मुलगी ते IAS अधिकारी रेनू राजचा प्रवास हजारो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. चिकाटी, मेहनत आणि ध्येयाप्रती निष्ठा असेल तर यश नक्की मिळते हे त्यांनी सिद्ध केले आहे.