Deepak Kulkarni
आयएएस अधिकारी रेणू राज या एक अत्यंत शिस्तप्रिय आणि डॅशिंग आयएएस अधिकारी म्हणून ओळखल्या जातात.
रेणूराज या केरळमधील कोट्टायमची रहिवासी आहे.
त्यांनी यूपीएससी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली.
यूपीएससीची परीक्षा देण्यासाठी रेणू राज यांना मेडिकल प्रॅक्टिस सोडावी लागली.
त्या पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाल्याच, शिवाय दुसरा क्रमांकही पटकावला.
त्यांचे वडील निवृत्त सरकारी कर्मचारी तर आई गृहिणी आहे. रेणू यांना दोन बहिणी असून त्याही डॉक्टर आहेत.
एक डॉक्टर म्हणून मी 50 किंवा 100 रुग्णांना मदत करू शकले असते, पण प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना माझा एक निर्णय हजारो लोकांना लाभ देऊ शकतो. हा विचारच मला यूपीएससीकडे घेऊन आला.
रेणू राज यांचे शालेय, महाविद्यालयीन आणि वैद्यकीय शिक्षण केरळमधील कोट्टायम येथे झाले.