Rashmi Mane
आयएएस होणं प्रत्येकाच्या नशिबी नसतं, पण जे प्रमाणिकपणे मेहनत करतात त्यांना यश नक्कीच मिळते.
रितिका जिंदाल ही देखील अशा यशस्वी लोकांपैकी एक आहे, ज्यांनी आयुष्यातील समस्यांना तोंड देत UPSC परीक्षा उत्तीर्ण केली.
रितिकाच्या वडिलांना तोंडाच्या कॅन्सरने ग्रासले होते, त्यामुळे त्यांना त्यांची काळजी घेत यूपीएससीची तयारी करावी लागली.
2019 मध्ये तिच्या दुसऱ्या प्रयत्नात, रितिकाने वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी UPSC परीक्षा 88 व्या क्रमांकाने उत्तीर्ण केली आणि ती IAS अधिकारी बनली.
रितिका जिंदाल सध्या पांगी, हिमाचल प्रदेश येथे निवासी आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.
विशेष म्हणजे सीबीएसई 12वी कॉमर्स परीक्षेत रितिका उत्तर भारतात अव्वल राहिल्याने तिला पीएम मोदींनी सन्मानित केलं होत.
रितिकाने दिल्लीच्या श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून पदवी घेतले आहे.