Rajanand More
आयएएस रुचिका चौहान या देशातील प्रसिध्द ग्वाल्हेर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आहेत. या जिल्ह्याच्या त्या पहिल्या महिला कलेक्टर ठरल्या आहेत.
ग्वाल्हेर जिल्ह्यात त्या मागीलवर्षीपासून कार्यरत आहेत. त्याआधी त्या मध्य प्रदेश सरकारमध्ये अपर सचिव पदावर होत्या. तसेच रतलाममध्ये जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
एका बैठकीदरम्यान नगरसेविकांच्या जागी त्यांचे पती खुर्चीवर बसल्याचे पाहून त्या भडकल्या होत्या. त्यानंतर त्यांना उठवून मागील खुर्चीत बसण्यास सांगितले. त्यामुळे सध्या त्यांची चर्चा होत आहे.
ग्वाल्हेरमध्ये आल्यानंतर महिनाभरातच त्यांनी रील बनविणाऱ्यांना झटका दिला होता. सार्वजनिक ठिकाणी व्हिडीओ, रील शूटिंग, फोटोग्राफी करण्यास त्यांनी मनाई आदेश जारी केला होता.
रुचिका चौहान यांनी 2009 मध्ये पहिल्यांदाच यूपीएससी क्रॅक केली होती. त्यांची आयपीएस म्हणून निवड झाली. त्यानंतर पुन्हा परीक्षा दिल्यानंतर त्या आयएएससाठी पात्र ठरल्या.
रुचिका चौहान यांनी इलेक्ट्रॉनिक्स अन्ड कम्युनिकेशनमध्ये पदवी प्राप्त केली आहे. पदवी मिळाल्यानंतर त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली होती.
मुळच्या मध्य प्रदेशातीलच इंदौरमधील आहेत. 20 डिसेंबर 1984 मध्ये त्यांचा जन्म झाला. याच शहरात पदवीपर्यंतच शिक्षणही झाले.
मध्य प्रदेश प्रशासनामध्ये कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. हाती घेतलेले काम लवकरात लवकर तडीस नेण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे.