Rashmi Mane
रुक्मणी रियार या पंजाबच्या गुरदासपूरमधील. शालेय काळात त्या खूप हुशार नव्हत्या – इतकंच काय, तर त्या सहावीत नापासही झाल्या होत्या.
नापास झाल्यानंतर त्यांनी स्वतःशीच स्पर्धा केली. परिश्रम, चिकाटी आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर त्यांनी शिक्षणात नवे उच्चांक गाठले.
रुक्मणी यांचे प्राथमिक शिक्षण गुरदासपूर येथे झाले. माध्यमिक शिक्षण – सेक्रेड हार्ट स्कूल, डलहौजी तर पदवी – गुरु नानक देव विद्यापीठ, अमृतसर येथे झाली. पदव्युत्तर शिक्षण टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई (TISS) येथे त्यांनी गोल्ड मेडल मिळवला!
इंटरशिपदरम्यान समाजातील समस्या जवळून पाहिल्या आणि तेव्हाच UPSC अधिकारी होण्याचा निर्धार केला.
रुक्मणीने कोणतीही कोचिंग घेतली नाही. त्यांनी संपूर्ण अभ्यास सेल्फ स्टडी द्वारे केला – हेच त्यांचं यशाचं गुपित आहे.
2011 मध्ये रुक्मणी रियार यांनी पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा पास केली आणि मिळवली देशात दुसरी रँक!