Rashmi Mane
देशातील सर्वात कठीण समजली जाणारी यूपीएससी परीक्षा… आणि त्या परीक्षेत अव्वल यश मिळवले रुपल राणा यांनी! ही आहे त्यांची प्रेरणादायी कहाणी.
उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यातील बडोत गावच्या रहिवासी. सध्या त्यांचे कुटुंब दिल्लीत. वडील दिल्ली पोलिसमध्ये असिस्टंट सब-इन्स्पेक्टर.
रुपल यांनी शालेय शिक्षण बागपतच्या जेपी पब्लिक स्कूलमधून पूर्ण केले. त्यानंतर पिलान इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये 11वी-12वीचे शिक्षण घेतले.
यूपीएससी परीक्षेत दोनदा अपयश! पण त्यांनी हार मानली नाही. प्रयत्न चालूच ठेवले. आणि शेवटी मिळवली 26 वी रँक!
आईचं स्वप्न होतं की रुपल मोठ्या पदावर पोहोचावी. म्हणूनच रुपलने यूपीएससीमध्ये यश मिळवण्यासाठी तिसऱ्यांदा प्रयत्न केला.
परीक्षा काळात आई गंभीर आजारी पडली. रुपल अभ्यास आणि आईची सेवा एकत्र करत होत्या. निकालाच्या आधीच आईचं निधन झालं.
आई गेल्यानंतर देखील रुपलने आत्मबळ हरवू दिलं नाही. तिसऱ्या प्रयत्नात मिळवली यूपीएससीमध्ये 26 वी रँक – थेट आयएएस अधिकारी!
रुपल राणा यांचा प्रवास लाखो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा आहे. जिद्द, मेहनत आणि धैर्याचे मूर्तिमंत उदाहरण!