Rashmi Mane
सरकारने अजून कोणतीही स्पष्ट घोषणा केली नाही, पण आठव्या वेतन आयोगाच्या चर्चांनी सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता वाढवली आहे. जवळपास 1 कोटी कर्मचाऱ्यांचे भविष्य या निर्णयावर अवलंबून आहे.
सरकार अजूनही वेतन आयोगावर कोणतेही स्पष्ट विधान देत नाही. मात्र, संसदेत खासदारांनी प्रश्न विचारून दबाव वाढवला आहे.
सध्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सुरुवातीला 18,000 पगार दिला जातो. याच्या आधारे वेतनवाढीचे विविध अंदाज लावले जात आहेत.
फिटमेंट फॅक्टर म्हणजे मूळ पगारात किती पट वाढ होणार याचा मापदंड.
1.8 फिटमेंट फॅक्टर: 18,000 - 30,000
2.46 फिटमेंट फॅक्टर: 18,000 - 50,000 पेक्षा जास्त!
यामुळे सैलरी दुप्पट ते तिप्पट होण्याची शक्यता.
सध्या फ्रेशर IAS अधिकाऱ्यांची सैलरी साधारण 56,100 बेसिक पासून सुरू होतो.
1.92 फिटमेंट फॅक्टर: 1,47,387 ग्रॉस
2.28 फिटमेंट फॅक्टर: 1,75,022 ग्रॉस
नेट सॅलरी: 1.35 लाख ते 1.60 लाख पर्यंत!
देशभरात सुमारे 1 कोटी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्स उत्सुकतेने या निर्णयाची वाट पाहत आहेत.