Rashmi Mane
पोस्ट ऑफिसची सुकन्या समृद्धी योजना ही मुलींच्या शिक्षण व लग्नासाठी सरकारची एक सुरक्षित आणि टॅक्स फ्री बचत योजना आहे. सध्या या योजनेवर 8.2% वार्षिक व्याज दिलं जातं.
"सुकन्या समृद्धी योजना" देत आहे उच्च व्याजदर, करमुक्त परतावा आणि सुरक्षित गुंतवणूक पर्याय. जाणून घ्या कशी मिळवता येईल 70 लाखांची रक्कम!
हे पोस्ट ऑफिसचं एक विशेष बचत खातं आहे, जे फक्त मुलींच्या नावाने उघडता येतं. सध्या या योजनेवर 8.2% व्याजदर लागू आहे आणि हे पूर्णपणे टॅक्स फ्री आहे.
वर्षाला 250 रुपये ते 1.5 लाख रुपये गुंतवू शकता. एका कुटुंबात जास्तीत जास्त 2 मुलींसाठी खाते उघडता येतं. जुळ्या मुली असतील तर 3 खातीही उघडता येतील.
खाते उघडल्यापासून 15 वर्षांपर्यंत रक्कम भरावी लागते. मात्र खाते 21 वर्षांनंतर मॅच्युअर होतं. या दरम्यान भरलेली रक्कम आणि व्याज मिळून मोठी बचत तयार होते.
मुलगी 18 वर्षांची झाल्यावर किंवा 10वी उत्तीर्ण केल्यावर काही भाग काढता येतो. लग्नासाठी 18 वयानंतर पूर्ण रक्कमही मिळू शकते.
दरवर्षी किमान 250 रुपये जमा करणे गरजेचे आहे. न केल्यास खाते डिफॉल्टमध्ये जाईल. मात्र 15 वर्षांच्या आत पुन्हा सुरु करता येतं.
जर तुम्ही दररोज फक्त 400 रुपये म्हणजेच महिन्याला 12,500 रुपये आणि वर्षाला 1.5 लाख रुपये गुंतवले, तर 21 वर्षांत मिळतील 69.27 लाख रुपये!