सरकारनामा ब्यूरो
या उपक्रमाचे श्रेय तामिळनाडूच्या थुथुकुडीचे जिल्हाधिकारी संदीप नांदुरी यांना जाते.
सरकारकडे पेन्शन किंवा नोकरीची मागणी करणाऱ्या दिव्यांगांकडून प्रेरणा घेत, त्यांनी हा आगळा-वेगळा उपक्रम सुरू करण्याचे ठरवले.
दिव्यांग व्यक्तींमधील आत्मविश्वास वाढून त्यांच्यातील स्वावलंबनाला चालना देण्यासाठी अशा प्रकारच्या कॅफेची स्थापना करण्याचा नांदुरी यांनी निर्णय घेतला.
यासाठी त्यांना स्वयंपाक, केटरिंग आणि बेकिंगच्या ४५ दिवसांच्या प्रशिक्षण वर्गात नावनोंदणी करण्यास प्रोत्साहन दिले.
प्रशिक्षणार्थींना ग्राहक प्रतिसाद, तसेच संकटांना सामोरे जाणे आणि पैशांचे नियोजन करणे या सगळ्या गोष्टी शिकवल्या.
CSR निधी आणि देणग्या वापरून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच त्यांनी या 'कॅफे एबल'ची स्थापना केली.
अशा लोकांमधील क्षमता वाढीसाठी नांदुरी यांनी सुरू केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आणि विकासाला चालना देणारा आहे.
अपंगत्व तसेच दिव्यांगांबद्दलचे लोकांचे गैरसमज कमी झाले. ज्यामुळे अधिकाधिक लोकांनी स्वतःचे उद्योग सुरू केले आहेत.
R