सरकारनामा ब्यूरो
कोचिंग क्लास लावून परीक्षेची तयारी करणारे अनेक जण असतात. परंतु कोणताही क्लास न लावता यशस्वी होणारे अगदी बोटावर मोजण्या इतके असतात, त्यातीलच एक आहेत सर्जना यादव.
सर्जना यादव यांनी दिल्लीतून शिक्षण पूर्ण केलं आहे. येथूनच टेक्नोलॉजिकल यूनिवर्सिटीतून त्यांनी इंजीनिअरिंगची पदवी मिळवली.
त्या शिक्षणानंतर 'Telecom Regulatory Authority of India' (TRAI) येथे रिसर्च अधिकारी म्हणून काम करत होत्या.
नोकरी करताना त्या UPSC परीक्षेची तयारी करत होत्या. परंतु काम करत त्यांना अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करता येत नसल्याने त्यांनी 2018 मध्ये नोकरी सोडली.
'यूपीएससी' परीक्षेची तब्बल 3 वर्ष तयारी केल्यानंतर 2019 मध्ये परीक्षा दिली.
सर्जना या संपूर्ण भारतातून 126 वा रँक मिळवत परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत.
त्या सध्या मध्यप्रदेश केडरच्या 'आयएएस' अधिकारी आहेत.
सर्जना या सोशल मीडियावर सक्रिय असतात. इंस्टाग्रामवर त्यांचे 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.