IPS Anjum Ara: धाडसी अन् कौतुकास्पद! दुसऱ्या महिला मुस्लिम IPS अंजुम आरा यांंच्या 'त्या' निर्णयाची जोरदार चर्चा

सरकारनामा ब्यूरो

सगळीकडे कौतुक

अंजुम आरा आणि त्यांचे पती युनूस यांच सगळीकडे कौतुक केलं जात आहे. काय आहे यांच कारण पाहूयात...

IPS Anjum Ara | Sarkarnama

दत्तक

अंजुम आरा यांनी लहान मुलीला दत्तक घेतलं आहे.

IPS Anjum Ara | Sarkarnama

वडीलाचं पोस्टिंग

अंजुम या आजमगढ जिल्ह्यातील कुम्हरिया येथील रहिवासी होत्या. वडील अयूब शेख यांच पोस्टिंग सहारनपूर येथे झाल्यानतंर त्या येथेच स्थायिक झाल्या आहेत.

IPS Anjum Ara | Sarkarnama

शिक्षण

अंजुम यांनी त्यांचं शालेय शिक्षण सहारनपूर येथे पूर्ण करुन एलिमेंटरीची परीक्षाही दिली. बी.टेक केल्यानंतर त्यांनी UPSC परीक्षा देण्याच ठरवल.

IPS Anjum Ara | Sarkarnama

दुसऱ्या प्रयत्नात त्या उत्तीर्ण

पहिल्या परीक्षेत त्यांना अपयश आले. मात्र हार न मानता 2011 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा UPSCची परीक्षा दिली आणि दुसऱ्या प्रयत्नात त्या उत्तीर्ण झाल्या. आयपीएस हे पद देऊन त्यांचं पहिल पोस्टिंग मणिपूरमधील इफाळ येथे कऱण्यात आलं होतं. येथे त्यांनी त्यांचं प्रशिक्षण पूर्ण केलं.

IPS Anjum Ara | Sarkarnama

एसीपी

काही वर्षांनी त्यांची बदली हिमाचल प्रदेशमध्ये कऱण्यात आली. सोलनच्या एसीपी म्हणून त्यांनी काम केलं आहे. येथे त्यांच्या कामामुळे त्यांचं खूप कौतुक करण्यात आलं होतं.

IPS Anjum Ara | Sarkarnama

पती IAS अधिकारी

अंजुम यांचं लग्न युनूस खान यांच्याशी झालं आहे. युनूस हे हिमाचल प्रदेशमध्ये IAS अधिकारी असून या दोघांना एक मुलगा आहे.

IPS Anjum Ara | Sarkarnama

शहीद परमजीत यांची मुलगी दत्तक

अंजुम आणि युनूस यांनी सीमेवर देशाचं रक्षण करत असताना शहीद झालेले पंजाब मधील तरनतारन येथील नायब शुभेदार परमजीत यांची मुलगी खुशदीप हिला दत्तक घेतलं आहे. यामुळे त्यांचं सगळीकडे खूप कौतुक केले जात आहे.

IPS Anjum Ara | Sarkarnama

सोशल मीडियावर पोस्ट

अंजुम आणि युनूस यांनी खुशदीपबरोबरचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

IPS Anjum Ara | Sarkarnama

Next : वडिलांच्या पाऊलावर पाऊल टाकत ती बनणार कलेक्टर..

येथे क्लिक करा...