IAS Saumya Sharma : फक्त 4 महिने अभ्यास करुन UPSC केली क्रॅक, कोण आहे IAS सौम्या शर्मा?

Ganesh Sonawane

4 महिन्यांत UPSC क्रॅक

आयएएस सौम्या शर्मा यांनी 2017 मध्ये पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा क्रॅक केली. पदवी नंतर अवघे चार महिने आधी त्यांनी तयारी सुरु केली व 9 वा क्रमांक पटकावला.

IAS Saumya Sharma | Sarkarnama

10 ते 15 तास अभ्यास

सौम्या यांच्याकडे तयारीसाठी खूप कमी वेळ होता. त्यामुळे त्यांनी दररोज 10 ते 15 तास अभ्यास केला. चार महिन्यांसाठी स्वत:ला झोकून दिले.

IAS Saumya Sharma | Sarkarnama

नो क्लासेस

त्यांनी आपला संपूर्ण अभ्यास स्वयं अध्ययनाच्या जोरावर केला, यासाठी त्यांनी कोणतेही क्लासेस केले नाहीत.

IAS Saumya Sharma | Sarkarnama

शालेय शिक्षण दिल्लीत

सौम्या शर्मा या मूळच्या दिल्लीच्या आहेत. त्यांचे शालेय शिक्षण दिल्लीत पूर्ण झाले आहे. त्यांनी उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर, प्रतिष्ठित नॅशनल लॉ स्कूल, नवी दिल्ली येथून पदवी प्राप्त केली.

IAS Saumya Sharma | Sarkarnama

अपंगत्वावर मात

सौम्या 11 वीत असताना त्यांची श्रवणशक्ती कमी होऊ लागली होती. त्यावेळी त्या फक्त 16 वर्षांच्या होत्या. सौम्या यांना श्रवणयंत्र वापरायची गरज पडली. सौम्यासाठी हा खरोखरंच मोठा धक्का होता.

Saumya Sharma | Sarkarnama

जिद्द सोडली नाही

तरी देखील 16 वर्षांच्या सौम्याने जिद्द सोडली नाही. तिला माहित होते की हा तिच्या जीवनाचा शेवट नाही त्यामुळे ती लढली आणि जिंकली देखील.

IAS Saumya Sharma | Sarkarnama

सोशल मीडियावर सक्रिय

एक प्रेरणादायी आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व असणाऱ्या IASसौम्या सोशल मीडियावरही सक्रिय आहे.

IAS Saumya Sharma | Sarkarnama

नवराही आयपीएस

त्यांचे लग्न आयपीएस अर्चित चांडक यांच्याशी झाले आहे.

IAS Saumya Sharma | Sarkarnama

NEXT : नाना पाटेकर पोहोचले उपमुख्यमंत्र्यांच्या शेतात, स्ट्राॅबेरी, आंब्यावर ताव...

Nana Patekar in Eknath Shinde Farm | sarkarnama
येथे क्लिक करा