सरकारनामा ब्यूरो
घरची परिस्थिती हलाखीची. अवघ्या 16व्या वर्षी घरच्यांनी लग्न करुन दिल. लग्नानंतर प्रचंड मानसिक छळ झाला तरीही खंबीरपणे अनेक संकटांना समोरे जात IAS झालेल्या सविता प्रधान यांची सक्सेस स्टोरी.
सविता प्रधान या मध्य प्रदेशमधील मंडी या गावातील आहेत. सविता यांचं आयुष्य लहानपणापासूनचं खूप खडतर होत. घरची परिस्थिती ही प्रचंड हलाखीची असल्याने त्यांना त्यांची स्वप्न पूर्ण करता आली नाहीत.
सविता यांना शिक्षणाची खूप आवड होती. मंडीतील सरकारी शाळेत त्यांनी त्यांच 10 पर्यंतचं शिक्षण झाल. गावापासून 7 किसोमीटरचा रोजचा प्रवास करत त्यांनी 12वी पर्यंतचं शिक्षण घेतल.
सविता यांना श्रीमंत घरातून लग्नासाठी मागणी आल्याने घरच्यांनी अवघ्या 16व्या वर्षी त्यांच्यापेक्षा 11वर्षांनी मोठ्या असलेल्या मुलाशी करुन दिल.
लग्नानंतर त्यांच्या सासरच्या लोकांनी त्यांना खूप त्रास दिला. या त्रासाला त्या प्रचंड कंटाळाल्या होत्या. त्यांनी अनेक वेळा आत्महत्या करण्याचा विचार देखील केला. परंतु त्यांना दोन मुले असल्याने त्यांनी हा छळ अनेक वर्ष असाच सहन केला.
सविता मुलांनकडे पाहून खंबीर झाल्या. त्यांनी त्यांच आयुष्य त्रासात काढल परंतु मुलांना चांगल आयुष्य द्यायचं अस ठरवून शेवटी त्यांनी दोन्ही मुलांसह सासर सोडलं. मुलांचा सांभळ करणायासाठी त्यांनी पार्लरमध्ये नोकरी केली.
मुलांना शिकवत असताना त्यांनी MPSC परीक्षा देण्याचं ठरवत परीक्षेची तयारी सुरु केली. 2005 मध्ये त्यांनी परीक्षा दिली आणि पहिल्याचं प्रयत्नात MPSC परीक्षा उत्तीर्ण केली. मुख्य परीक्षा आणि मुलाखत पास केल्यानंतर त्यांना 75000 रुपये स्कॉलरशिप मिळाली.
सविता यांची नेमणूक प्रशासकीय सेवेत IAS अधिकारी म्हणून करण्यात आली. यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग नरसिंहपूर येथे करण्यात आली.
अधिकारी झाल्यानंतरही त्यांचा पती त्यांना त्रास देत होता. यामुळे त्यांनी पतीला घटस्फोट दिली. यानंतर त्यांनी 2015 मध्ये डॉ.हर्ष राय याच्यांशी दुसरं लग्न केल.