सरकारनामा ब्यूरो
प्रियांका गांधी केरळमधील वायनाड मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. पहिल्यांदाच लोकसभेवर निवडून आल्यानंतर प्रियांका गांधी-वाड्रा यांनी खासदारकीची शपथ घेतली.
शपथविधी सोहळा
या शपथविधी सोहळ्यात गांधी यांनी खास पांढऱ्या आणि गोल्डन रंगाच्या बॉर्डरची साडी नेसली होती.
प्रियांका गांधी यांनी नेसलेली साडी ही केरळची पारंपारिक 'कासवू साडी' आहे.
या साडीच्या काठावर सोनेरी रंगाची बॉर्डर असलेली किनार आहे, त्यालाच 'कासवू' म्हणतात.
कासवू साडी ही पारंपारिक पध्दतीने चांदी किंवा सोन्याच्या धाग्याने तयार केलेली असते. अशा प्रकारच्या साड्या केरळमध्ये बनवल्या जातात.
केरळमध्ये प्रसिद्ध असलेल्या कासवाचा वापर हा फक्त साडीतच नाही तर धोतर बनवतानाही केला जातो. यालाच कासव मुंडू म्हटलं जात.
ही साडी हातमागावर बनवली जाते. ही साडी साधी असते, पण दिसायला खूप सुंदर दिसते. ही साडी खास प्रसंगी नेसली जाते .
बंधू राहुल गांधी, आई सोनिया गांधी, पती रॉबर्ट वाड्रा आणि त्यांची मुलेही शपथविधी सोहळ्याला उपस्थित होती.