Rashmi Mane
अतिशय सुंदर आणि आत्मविश्वासाने भरलेल्या या अधिकारी एखाद्या मॉडेलपेक्षा कमी दिसत नाहीत, पण अधिकारी बनण्यासाठी त्यांना प्रचंड कष्ट आणि संकटांचा सामना करावा लागला.
सविता प्रधान त्यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. अभ्यासापासून ते वैवाहिक जीवनापर्यंत त्यांना अनेक संघर्षाचा सामना करावा लागला.
मध्य प्रदेशातील कर्तत्ववान अधिकाऱ्यांमध्ये त्यांची गणना होते. सध्या त्या ग्वाल्हेर विभागात सहसंचालक आहेत.
2021मध्ये त्या खांडवा महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त झाल्या. मंदसौरचे सीएमओ असताना त्यांनी माफियांविरुद्ध मोहीम उघडली होती. अफू तस्करांवरदेखील त्यांनी कारवाई केली.
सविता प्रधान यांचा जन्म मध्य प्रदेशातील मंडी गावात एका आदिवासी कुटुंबात झाला. त्या अत्यंत गरिबीत वाढल्या. दहावी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या त्या आपल्या गावातील पहिली मुलगी होत्या.
वयाच्या 16-17 व्या वर्षी त्यांचे लग्न लावून देण्यात आले. सविता प्रधान यांचे वैवाहिक जीवन अडचणींनी भरलेले होते. सासरच्या मंडळींनी त्याचा खूप छळ केला.
दोन मुले झाल्यानंतरही त्यांचा नवरा त्यांना मारहाण करत होता. त्याला कंटाळून प्रधान यांनी गळफास लावण्याचीही तयारी केली होती. त्यानंतर त्यांनी मुलांसह सासरचे घर सोडले आणि पार्लरमध्ये काम करण्यासोबतच अभ्यासही सुरू केला.
सविता यांनी इंदूर विद्यापीठातून लोक प्रशासनात पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि पहिल्याच प्रयत्नात नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली.