Sachin Fulpagare
महाविकास आघाडीकडून मिलिंद देवरांना दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळण्याची शक्यता धूसर झाली होती. ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेला मिळणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून दक्षिण मुंबईत मतदारसंघात ठाकरेंचे विद्यामन खासदार अरविंद सावंत यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची चिन्हे आहेत.
काँग्रेसमधून जागा मिळणार नसल्याचे समजल्यावर मिलिंद देवरा हे भाजपसोबत जाणार असल्याची सर्वत्र चर्चा सुरू होती.
भाजपही दक्षिण मुंबई मतदारसंघासाठी आग्रही असल्याचे समजते. त्यामुळे भाजपमध्ये न जाता उमेदवारीसाठी देवरा शिंदे गटात आल्याची चर्चा आहे.
ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गट मिलिंद देवरांना उमेदवारी देणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष आहे.
महायुतीत दक्षिण मुंबईची जागा कोण लढवणार, याची उत्सुकता सगळ्यांना आहे. भाजपकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावाची चर्चा आहे.
दक्षिण मुंबईच्या जागेसाठी भाजप आग्रही आहे. त्यामुळे महायुतीत ही जागा शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार की नाही? हा प्रश्न आहे. कारण भाजपने या जागेसाठी सेनेला कोणतीही हमी दिलेली नाही. त्यामुळे देवरा फसले का?