Rashmi Mane
बारामतीची लेक आणि करमाळ्याच्या सूनबाई शुभांगी पोटे केकान यांनी यूपीएससी परीक्षेत 530 वा रँक मिळवत, त्या 'यूपीएससी' परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत.
शुभांगी केकान यांनी लग्नानंतर सात वर्षांनी स्पर्धा परीक्षा द्यायचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली.
'बीडीए' झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस करमाळा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांनी प्रॅक्टिस केल्यानंतर प्रॅक्टिस सोडून पूर्णवेळ स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला.
शुभांगी यांंनी घरच्या जबाबदाऱ्या पार पाडत घरी राहून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला, अन् तिसऱ्या प्रयत्नात त्यांना यश मिळालं.
पतीकडून प्रेरणा घेत त्यांनी यूपीएससी परीक्षेचा अभ्यास केला.
"आपल्या मनात जिद्द असेल, तर आपण नक्कीच कुठलीही परीक्षा सहजपणे यशस्वी होऊ शकतो," असंही त्या सांगतात.