मॅडम, मानलं तुम्हाला! ‘या’ डॅशिंग महिला IAS थेट सरकारला भिडल्या...

Rajanand More

IAS स्मिता सभरवाल

तेलंगणा केडरच्या आयएएस अधिकारी स्मिता सभरवाल पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. यावेळी त्या थेट राज्य सरकारला भिडल्या आहेत. राज्य सरकारच्या भूमिकेवरच त्यांनी बोट ठेवले आहे.

Smita Sabharwal | Sarkarnama

सोशल मीडियात पोस्ट

हैदराबादमधील कांचा गचिबोवली जंगलातील वृक्षतोडीवरून सरकारवर प्रचंड टीका झाली होती. सभरवाल यांनी थेट त्यावरूनच सरकारच्या भूमिकेवर टीकात्मक पोस्ट सोशल मीडियात केली आहे.

Smita Sabharwal | Sarkarnama

घिबली इमेज

सभरवाल यांनी एक घिबली इमेर रिशेअर केली आहे. या इमेजमध्ये जंगलाबाहेर बुलडोझर दाखवण्यात आले असून त्यासमोर मोर आणि हरणं उभी राहिलेली दिसतात.

Ghibli Image | Sarkarnama

प्रशासन हादरलं

या पोस्टमुळे सरकार हादरलं आणि थेट त्यांची पोलिस चौकशी करण्यात आली. त्यानंतर मग सभरवाल यांनी पोलिसांनाच ही पोस्ट शेअर करणाऱ्या इतरांचीही चौकशी करणार का, असा उलट सवाल केला.

Smita Sabharwal | Sarkarnama

आता बदली

वादानंतर सभरवाल यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्या युवा, पर्यटन व सांस्कृतिक विभागात विशेष मुख्य सचिव होत्या. आता त्यांना राज्य वित्त आयोगाच्या सदस्य सचिवपदी नियुक्त करण्यात आले आहे. 

Smita Sabharwal | Sarkarnama

डॅशिंग अधिकारी

सभरवाल यांची ओळख डॅशिंग अधिकारी म्हणून आहे. वयाच्या 23 व्या वर्षी 2000 साली त्या आयएएस बनल्या आहेत. त्यांना तेलंगणा प्रशासनाचा तब्बल 25 वर्षांचा अनुभव आहे.

Smita Sabharwal | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांच्या सचिव

के. चंद्रशेखर राव मुख्यमंत्री असताना त्या सचिवपदी होत्या. काँग्रेसची सत्ता आल्यानंतर त्यांना या पदावरून हटवण्यात आले होते.

Smita Sabharwal | Sarkarnama

मुळच्या बंगालच्या

सभरवाल या मुळच्या पश्चिम बंगालच्या आहेत. त्यांचे वडील लष्करात अधिकारी होते. नंतर त्यांची तेलंगणात बदली झाली आणि स्मिता यांचे शिक्षणही मग इथेच झाले.

Smita Sabharwal | Sarkarnama

दुसऱ्या प्रयत्नात IAS

स्मिता यांनी दुसऱ्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली होती. त्या देशात चौथ्या आल्या होत्या. आता अत्यंत कार्यक्षण अधिकारी म्हणून त्यांची ओळख असून अनेक महत्वाची पदे सांभाळली आहेत.

Smita Sabharwal | Sarkarnama

NEXT : चला काश्मीरला, दहशतवादाला हरवायचंय! मराठमोळ्या अभिनेत्यानं गाठलं पहलगाम...

येथे क्लिक करा.