सरकारनामा ब्यूरो
अवघ्या 23 व्या वर्षी UPSC ची परीक्षा उत्तीर्ण करत स्मिता सभरवाल या भारतातील सर्वात तरुण महिला IAS अधिकारी बनल्या आहेत.
पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यात स्मिता यांचा जन्म झाला. येथेच त्याचं बालपणही गेलं.
त्यांचं शिक्षण सिकंदराबादमधील तेलंगणा सेंट ॲन्ड हायस्कूलमध्ये पूर्ण झालं.
UPSC परीक्षा पास करणं आणि सैन्यात भरती होण हे त्यांच स्वप्न होतं.
यूपीएससी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होत त्यांनी ते स्वप्न पूर्ण केलं.
UPSC परीक्षेत स्मिता सभरवाल यांनी ऑल इंडिया चौथी रँक मिळवली.
सध्या त्यांचं इयत्ता 12वी च्या मार्क्सशिटचा एक फोटो 'X' या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.
फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं '12वी चागंल्या क्रमांकानी पास होणं ही खूप चांगली आठवण आहे.' चांगले मार्क्स पाहून फॉलोअर्संनी त्यांना भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत.
लोकांच्या समस्या सोडवण्याऱ्या IAS अशी स्मिता सभरवाल यांची तेलंगनामध्ये विशेष ओळख आहे.