Pradeep Pendhare
19 जून 1977 रोजी पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग येथे जन्मलेल्या स्मिता सभरवाल प्रसिद्ध IAS अधिकारी आहेत.
स्मिता सभरवाल ही बारावीच्या परीक्षेत बोर्डात टॉप झाली होती. यानंतर वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी ती आयएएस अधिकारी बनली
आयएएस परीक्षेत संपूर्ण देशात चौथा क्रमांक पटकावला होता. 2001 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी आहेत.
स्मिता सभरवाल यांचा जन्म दार्जिलिंगमध्ये झाला असेल, पण त्यांनी नववीपर्यंतचे शिक्षण हैदराबादमध्ये घेतले.
IAS झाल्यावर नंतर तिची तेलंगणा केडरमध्ये बदली झाली. तेलंगणात बीआरएस सरकार असताना पहिली महिला आयएएस म्हणून सीएमओ म्हणून नियुक्त झाली होती.
स्मिता सभरवाल या देशातील अशा आयएएस अधिकाऱ्यांपैकी एक आहेत ज्या सोशल मीडियाचा भरपूर वापर करतात. स्मिता सभरवाल यांचे पती आयपीएस आहेत.
स्मिता सभरवाल यांची पहिली स्वतंत्र नियुक्ती चित्तूरमधील मदनपल्ले येथे उपजिल्हाधिकारी म्हणून होती.
एप्रिल 2011 मध्ये करीमनगर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी पदभार घेतला. यानंतर 2012-2013 साठी पंतप्रधानांच्या 20 कलमी कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट जिल्ह्याचा पुरस्कार देण्यात आला.
सभरवाल हे लोकाधिकारी म्हणून ओळखले जातात. स्काईपद्वारे सरकारी डॉक्टरांच्या देखरेखीमुळे सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे.