Rashmi Mane
स्मिता सभरवाल यांना 'जनता अधिकारी' म्हणूनही ओळखले जाते.
'आयएएस' अधिकारी म्हणून केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
सभरवाल या देशभरातील 'आयएएस' इच्छुकांसाठी प्रेरणा बनल्या आहेत.
२००० च्या 'यूपीएससी' परीक्षेत 'चौथी रँक' मिळवून त्या 'आयएएस' टॉपर बनल्या होत्या.
स्मिता या मूळच्या दार्जिलिंगच्या आहेत. स्मिता यांनी नववीपर्यंतचे शिक्षण हैदराबादमध्ये घेतले त्यानंतर सेंट अॅन्स, मरेडपल्ली, हैदराबाद येथून बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे.
'आयसीएसई' बोर्डातून बारावीमध्ये 'ऑल इंडिया लेवलवर फर्स्ट रॅंक' मिळवला होता. त्यानंतर त्यांनी सेंट फ्रान्सिस डिग्री कॉलेज फॉर वुमनमधून बी.कॉम केले.
ग्रॅज्युएशननंतर स्मिता सभरवाल यांनी 'सर्व्हिस' परीक्षेची तयारी सुरू केली. मात्र, स्मिता पहिल्याच प्रयत्नात अयशस्वी ठरल्या आणि प्रिलिम परीक्षाही पास करू शकल्या नाहीत.
पहिल्याच प्रयत्नात अपयश झाल्यानंतरही स्मिता सभरवाल यांनी हार न मानता दुसऱ्यांदा मेहनत घेऊन परीक्षा दिली. स्मिता यांनी 2000 मध्ये UPSC परीक्षेत चौथा क्रमांक मिळवला आणि वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी त्या IAS अधिकारी बनल्या.