सरकारनामा ब्यूरो
UPSC ची परीक्षा पास करणं खूप कठीण असतं यासाठी वर्षानुवर्ष विद्यार्थी परीक्षेची तयारी करत असतात. परंतु सोनिया मीना यांना एवढं सगळं करण्याची आवश्यकता लागली नाही. एकदा वाचाच...
2013 मध्ये त्यांनी पहिल्याचं प्रयत्नात 36 वा रँक मिळवत परीक्षेत उत्तीर्ण झाल्या.
सोनिया या राजस्थान येथील असून UPSC मध्ये निवड झाल्यानंतर त्याची नियुक्ती मध्य प्रदेशमध्ये करण्यात आली.
2017 मध्ये बुंदेल येथे वाळुमाफियांची वाहने जप्त करुन त्यांनी त्यांच्यावर मोठी कारवाई केली होती. त्यानंतर त्यांना अनेक धमक्यांचे फोन आले,पण त्या घाबरल्या नाहीत, म्हणूनच त्यांना 'दबंग' IAS अशी ओळख मिळाली.
सध्या सोनिया पुन्हा एकदा एका वेगळ्याचं कारणांनी चर्चेत आल्या आहेत. मध्य प्रदेशचे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जीएस अहलूवालिया यांनी त्यांना एका जमीन खटल्याच्या सुनावणी दरम्यान न्यायालयात उपस्थित राहण्यासाठी सांगितले होते.
सोनियांनी उपस्थित न राहून न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला. त्यांच्या जागी त्यांनी एका कनिष्ठ अधिकाऱ्याला सुनावणीसाठी पाठवले होते.
याचमुळे उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी आयएएस सोनिया यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश देऊन त्यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
दबंग कामगिरीसाठी ओळखल्या जाणाऱ्या सोनिया यांनी केलेल्या न्यायालयीन अवमानाच्या कृतीमुळे त्यांच्यांवर टीका करण्यात आली.