IAS Sreedhanya Suresh : होस्टेलमध्ये वॉर्डन ते IAS... केरळच्या आदिवासी महिला अधिकारी श्रीधन्या सुरेश यांची सक्सेस स्टोरी...

Rashmi Mane

UPSC परीक्षा

दरवर्षी अनेक उमेदवार UPSC परीक्षेत यश मिळवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतात, मात्र, त्यातील काही मोजकेच उमेदवार त्यांची स्वप्ने सत्यात उतरवू शकतात.

Sreedhanya Suresh | Sarkarnama

सक्सेस स्टोरी

आज त्यापैकीच एक असणाऱ्या UPSC उत्तीर्ण होऊन केरळच्या पहिल्या आदिवासी महिला IAS अधिकारी बनणाऱ्या श्रीधन्या सुरेशची सक्सेस स्टोरी तुम्हाला सांगणार आहोत. ज्यांनी प्रचंड मेहनतीच्या बळावर आणि अडचणींवर मात करत यूपीएससीत यश संपादन केले.

Sreedhanya Suresh | Sarkarnama

अडथळ्यांवर मात

श्रीधन्या सुरेश यांचा जन्म केरळच्या वायनाड जिल्ह्यात झाला. आयुष्यातील अडथळ्यांवर मात करत श्रीधन्या यांनी त्यांची क्षमता सिद्ध केली.

Sreedhanya Suresh | Sarkarnama

शिक्षण

श्रीधन्या यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला, त्यांचे आई-वडील मजूर होते. कठीण परिस्थितीतही त्यांच्या पालकांनी शिक्षणावर भर दिला.

Sreedhanya Suresh | Sarkarnama

प्राथमिक शिक्षण

श्रीधान्याने आपले प्राथमिक शिक्षण सेंट जोसेफ कॉलेज, कालिकतमधून पूर्ण केले. यानंतर, त्या प्राणीशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी कोझिकोड येथे गेल्या आणि नंतर तिच्या पदव्युत्तर पदवीसाठी कालिकत विद्यापीठात परतल्या.

Sreedhanya Suresh | Sarkarnama

सरकारी नोकरी आणि स्वप्न

पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यानंतर, श्रीधान्याची राज्य सरकारच्या अनुसूचित जमाती विकास विभागात नियुक्ती झाली, जिथे तिने आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात वॉर्डन म्हणून काम केले.

Sreedhanya Suresh | Sarkarnama

अधिकारी बनण्याचे स्वप्न

अनुसूचित जमाती विकास विभागात लिपिक म्हणून काम करत असताना आयएएस होण्याचे स्वप्न त्या पाहत होत्या. त्यानंतर त्यांनी यूपीएससी परिक्षा देण्याचा निर्णय घेतला.

Sreedhanya Suresh | Sarkarnama

UPSC यश

तिसऱ्या प्रयत्नांनंतर, त्यांनी 2018 मध्ये UPSC परीक्षा 410 व्या उत्तीर्ण केली. अन् केरळच्या पहिल्या आदिवासी महिला IAS अधिकारी बनल्या.

Sreedhanya Suresh | Sarkarnama

Next : तू माझी ताकद, माझा अभिमान! बाबा सिद्दीकींचे मुलीवर होते अपार प्रेम, काय करते अर्शिया? 

येथे क्लिक करा