Rashmi Mane
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर आहेत.
मोदींनी यावेळी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत 'एआय अॅक्शन समिट'चे सहअध्यक्षपद भूषवले आहे.
याशिवाय ते फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा देखील करणार आहेत.
फ्रेंच सशस्त्र दल मंत्री सबलेकोर्नू यांनी विमानतळावर त्यांचे जोरदार स्वागत केले.
हॉटेलमध्ये आगमन होताच भारतीयांनी पंतप्रधानांचे जोरदार स्वागत केले.
पंतप्रधान मोदी एलिसी पॅलेसमध्ये राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी राष्ट्रप्रमुख आणि सरकार प्रमुखांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या रात्रीच्या जेवणाला उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय, मोदी मार्सेली येथे भारताच्या नवीन वाणिज्य दूतावासाचे उद्घाटन करतील.