सरकारनामा ब्यूरो
UPSC मध्ये पास होणारे खूप कमी लोक असतात. त्यामध्येच एक तेजस्वी राणा आहेत.
हरियाणामध्ये राहणाऱ्या तेजस्वी राणा यांना लहानपणापासूनच इंजिनियरिंग करायचं होतं.
कानपूर मध्ये IIT करत असताना त्यांना UPSC परीक्षा देण्याची इच्छा झाली.
त्यानंतर त्यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरु केली. पहिल्या प्रयत्नात त्या प्रिलिम्स परीक्षा उत्तीर्ण झाल्या परंतु मुख्य परीक्षेत पास होऊ शकल्या नाही.
दुसऱ्यांदा परीक्षा देताना त्यांनी आपल्या चुका लक्षात घेऊन बेसिक पक्क केल.यात प्रश्नांची उत्तरे लिहिण्याचा सराव केला मॉक टेस्ट देत. इंटरनेटच्या साहाय्याने त्यांनी नोट्स बनवल्या.
कोणत्याही कोचिंगशिवाय UPSC परीक्षा उत्तीर्ण करत त्यांना 12वा रँक मिळाला.
तेजस्वी राणा या जलपाइगुडी, पश्चिम बंगाल येथे IAS अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.