Rashmi Mane
UPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर IAS अधिकारीपदासाठी निवड झालेल्या उमेदवारांची ट्रेनिंग लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी (LBSNAA), मसूरी येथे होते.
LBSNAA ही देशातील सर्वोच्च प्रशासकीय प्रशिक्षण संस्था आहे. येथे IAS, IPS यांसारख्या सेवांसाठी निवड झालेल्या अधिकाऱ्यांना विविध प्रशिक्षण दिलं जातं.
होय! प्रशिक्षण काळात उमेदवारांना पगार मिळतो. याला स्टायपेंड म्हणतात. ही रक्कम 7व्या वेतन आयोगानुसार दिली जाते.
IAS प्रशिक्षणार्थींना सध्या दरमहा सुमारे 56,100 बेसिक पे दिला जातो. यात अन्य भत्ते देखील असतात.
LBSNAA मध्ये राहण्याची व्यवस्था, मेस (जेवण), वीज-पाणी, ट्रेनिंग मटेरियल, यांसारख्या सुविधा दिल्या जातात.
या पगारातून वसतिगृह भाडं, मेस फी, वीज-पाणी शुल्क व इतर सेवा शुल्क वजा केलं जातं.
सर्व कपातीनंतर प्रशिक्षणार्थी IAS अधिकाऱ्याच्या हातात साधारणत: 40,000 ते 45,000 प्रतिमाह रक्कम उरते.
पगाराशिवाय अनेक अभ्यासदौरे, बाह्य प्रशिक्षण, शारीरिक व मानसिक विकासाचे सत्र याचा समावेश ट्रेनिंगमध्ये असतो.