IAS Tukaram Mundhe: 20 वर्षांच्या सेवेत तब्बल 24 वेळा बदली; आता धडाकेबाज तुकाराम मुंढेंची नोकरीच धोक्यात? 'हे' आहे प्रकरण

Deepak Kulkarni

तुकाराम मुंढे पुन्हा चर्चेत

आपल्या धडाकेबाज कार्यशैलीसाठी ओळखले जाणारे IAS अधिकारी तुकाराम मुंढे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 

IAS Tukaram Mundhe | Sarkarnama

20 वर्षांच्या प्रशासकीय सेवेत 24 वेळा बदल्या

तुकाराम मुंढेंच्या 20 वर्षांच्या प्रशासकीय सेवेत 24 वेळा बदल्या झाल्या आहेत. याच कारणास्तव त्यांच्या प्रशासकीय कार्यपध्दतीवर नेहमीच शंका उपस्थित केली जात आली आहे.

IAS Tukaram Mundhe | Sarkarnama

राजकीय नेतेही अडचणीत

त्यांच्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीमुळे प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह राजकीय नेतेही अडचणीत आले आहेत.

IAS Tukaram Mundhe | Sarkarnama

हिवाळी अधिवेशनादरम्यान चर्चेत

बदल्यांचा फटका सहन करत आलेले तुकाराम मुंढे आता नागपूर येथे सुरु असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

IAS Tukaram Mundhe | Sarkarnama

कारकीर्द अडचणीत

तुकाराम मुंढे हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात नागपूर महानगरपालिकेत आयुक्त असताना स्मार्ट सिटी प्रकल्पात नियमबाह्य काम , महिला अधिकाऱ्यांना दमदाटी आणि 17 कर्मचाऱ्यांचं विनाकारण निलंबन केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

IAS-Tukaram-Mundhe | Sarkarnama

भाजप आमदाराकडून निलंबनाची मागणी

हे आरोप करत भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात तुकाराम मुंढेंच्या निलंबनाची मागणी केली आहे. 

BJP MLA Krushna Khopde | Sarkarnama

थेट कारवाईचीच मागणी

त्यावेळी सीईओचे अधिकार नसतानाही मुंढेंनी 20 कोटी रुपये जारी केल्याचा ठपका ठेवत खोपडे यांनी हे प्रकरण गंभीर असल्याचं म्हणत थेट कारवाईचीच मागणी केली आहे.

IAS Tukaram Mundhe | Sarkarnama

सभागृहाचं कामकाजही स्थगित

हिवाळी अधिवेशनात नागपूरचे आमदार तुकाराम मुंढेप्रकरणी आक्रमक झाले असून वेलमध्ये आले. यानंतर प्रचंड गदारोळ झाल्यानं सभागृहाचं कामकाजही दहा मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं.

Krishna Khopde | Sarkarnama

नोकरीवरही टांगती तलवार

हिवाळी अधिवेशनात डॅशिंग अधिकारी तुकाराम मुंढेंच्या निलंबनाची मागणी करण्यात आल्यामुळे त्यांच्या नोकरीवरही टांगती तलवार निर्माण झाली आहे.

IAS Tukaram Mundhe | Sarkarnama

NEXT: कष्टकऱ्यांसाठी अख्खं आयुष्य समर्पित करणारे 'बाबा'; 95 वर्षी आंदोलन,'असा' राहिला आयुष्याचा झुंजार प्रवास

Baba Adhav.jpg | Sarkarnama
येथे क्लिक करा...