Deepak Kulkarni
ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांचे अल्पशा आजारानं सोमवारी (ता.8 डिसेंबर) पुण्यात निधन झाले.
बाबांनी आयुष्यभर जीवनभर कष्टकरी, महिला अन् समाजातील दुर्बल घटकांसाठी कार्य केले.
बाबांचा जन्म पुण्यात 1 जून 1930 रोजी झाला होता. ते नाना पेठेतील नामांकित आयुर्वेदिक डॉक्टर होते.
वैद्यकीय सेवेत काम करतानाच बाबांना कष्टकऱ्यांच्या अनेक अडचणी समजू लागल्या. कष्टकऱ्यांचे शोषण होऊनही त्यांचे कायदेशीर हक्कांपासून ते वंचित असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
बाबांनी यानंतर 1966 मध्ये त्यांचा उत्तमप्रकारे सुरू असलेला डॉक्टरकीच्या व्यवसायावर पाणी सोडले. शीलाताईंशी त्यांचा विवाह झाला.
यानंतर बाबांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य कष्टकरी असंघटिक कामगारांच्या लढ्यासाठी समर्पित केलं.
डॉ. बाबा आढाव 1970 च्या दशकात पुणे महापालिकेचे नगरसेवक राहिले होते.
बाबा हे तत्कालीन समाजवादी पक्षाचे सदस्य अन् रिक्षा पंचायतीचे प्रमुख नेते म्हणूनही काम पाहत होते. त्यांनी हमाल पंचायतीची स्थापना,गोवा स्वातंत्र्य संग्राम,संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन आंदोलन,धरणग्रस्त शेतकऱ्यांसाठी चळवळ अशा विविध आंदोलनात सहभाग नोंदवला.
एक गाव, एक पानवठा उपक्रम, कष्टाची भाकर,पथकरी पंचायत स्थापना, देवदासी निर्मूलन परिषद, मुस्लिम सत्यशोधक मंडळ स्थापना, राष्ट्रीय एकात्मता समिती, रिक्षापंचायत अशा अनेक मोठ्या चळवळी उभ्या केल्या.