सरकारनामा ब्यूरो
ध्येय निश्चीत असेल आणि ते गाठण्यासाठी इच्छाशक्ती प्रबळ असेल तर सक्सेस मिळतोचं. त्यातील एक आहेत 'आयएएस' वंदना मीणा.
राजस्थानमधील टोकसी या छोट्या गावच्या वंदना यांचं स्वप्न 'आयएएस' अधिकारी बनायचं होत आणि त्यांनी प्रचंड मेहनतीच्या जोरावर ते पूर्ण देखील केलं.
त्यांचे वडील पोलिस अधिकारी असल्याने त्यांच पोस्टिंग दिल्ली येथे करण्यात आले. त्यामुळे सर्व कुटुंबाबरोबर त्या येथेच स्थायिक झाल्या.
सवाई येथील माधोपुर आणि त्यानंतर दिल्ली मधील सेंट कोलंबस येथे मीणा यांनी त्यांच शिक्षण पूर्ण केल. तसंच त्यांनी B.Sc. Math Honours या विषयात पदवी मिळवली.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी UPSC परीक्षा देण्याचं ठरवलं. परीक्षेच्या तयारीसाठी त्या दररोज 10 तर परीक्षा जवळ आल्यावर 15 तास अभ्यास करायच्या.
2021 मध्ये त्यांनी UPSC ची परीक्षा दिली. यात त्यांनी संपूर्ण भारतातून 331 क्रमांक मिळवतं UPSCची परीक्षा उत्तीर्ण केली.
वंदना मीणा यांची सक्सेस स्टोरी त्यांच्या गावातील मुलींसाठी प्रेरणा ठरली आहे.