Rashmi Mane
दरवर्षी लाखो भारतीय तरुण IAS अधिकारी होण्याचे स्वप्न पाहतात. त्यासाठी प्रचंड मेहनत आणि कष्टाने यूपीएससी परीक्षेची तयारी करतात.
अशीच आहे IAS टॉपर विशाखा यादवची कहाणी. जिने 2019 मध्ये UPSC परीक्षेत सहावा ऑल इंडिया रँक मिळवत यूपीएससी उत्तीर्ण केली.
विशाखा यादव यांचा जन्म दिल्लीत झाला. त्यांचे शालेय शिक्षण दिल्लीतून झाले. त्यांनी दिल्लीतील टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (DTU) मधून इंजिनीअरिंग केले आहे.
विशाखाने लहानपणापासूनच आयएएस होण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यांनी त्यासाठी प्रचंड मेहनत घेतली.
विशाखा यांनी इंजिनीअरिंगची पदवी घेतल्यानंतर दोन वर्षे बेंगळुरूमध्ये सिस्कोमध्येही नोकरी केली. मात्र, त्यांना 'आयएएस' व्हायचं होतं, म्हणून त्यांनी नोकरी सोडून परीक्षेची तयारी केली.
परीक्षेची तयारी करण्यासाठी विशाखा बेंगळुरूहून दिल्लीला परतल्यानंतर त्यांनी कोचिंग सुरु केले. विशाखा म्हणतात की यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी रणनीती बनवणे आणि शेवटपर्यंत त्याचा अभ्यास करणे सर्वात महत्त्वाचे आहे.
तासनतास सतत अभ्यास करण्यापेक्षा छोटी छोटी ध्येयं ठेवली पाहिजेत, त्याचा उपयोग जास्त होतो. ही रणनीतीमुळे एकाग्रता आणि वेळेचे व्यवस्थापन सुधारण्यास देखील मदत करते.