Roshan More
IAS चे फुल फॉर्म आहे Indian Administrative Service म्हणजेच भारतीय प्रशासकीय सेवा. ही सेवा देशाच्या प्रशासकीय यंत्रणेची कणा मानली जाते.
IAS अधिकाऱ्यांचे काम म्हणजे धोरण तयार करणे, ती अंमलात आणणे आणि जिल्ह्यापासून राज्य व केंद्र सरकारपर्यंत प्रशासन सुरळीतपणे चालवणे.
IAS अधिकारी जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून कार्य करतात आणि सरकारी योजना अंमलात आणतात.
IPS
IPS म्हणजे भारतीय पोलिस सेवा (Indian Police Service ) कायदा-सुव्यवस्था राखणे आणि सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करणे ही IPS अधिकाऱ्यांची प्रमुख जबाबदारी असते.
जिथे IAS अधिकारी प्रशासनिक निर्णय घेतात, तिथे IPS अधिकारी ते निर्णय प्रत्यक्षात अंमलात आणतात.
IPS अधिकाऱ्यांचे प्रमुख काम म्हणजे गुन्हे रोखणे, गुन्हेगारांना शिक्षा मिळवून देणे, तसेच राज्य आणि जिल्ह्याची कायदा-सुव्यवस्था नियंत्रणात ठेवणे.
एका IAS अधिकाऱ्याच्या हाती प्रशासनिक नियंत्रण जास्त असते. म्हणजेच जिल्हास्तरावर IAS अधिकारी हा IPS पेक्षा वरिष्ठ असतो. परंतु कायदा आणि सुरक्षा व्यवस्था राखण्यात IPS अधिकाऱ्यांची भूमिका सर्वात महत्त्वाची असते.