Deepak Kulkarni
प्रशासकीय सेवेत असलेल्या किंवा केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रत्येक अधिकाऱ्यांसाठी विशिष्ट नियम असतात.
सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना ठरवून दिलेल्या नियमांचं पालन करणं बंधनकारक असतं.
यातल्या काही नियमांची सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड चर्चा होत असते.
सरकारी कार्यालय वा विशेष करून राजपत्रित अधिकारी वर्ग कामकाजात हिरव्या शाईचा पेन वापरतात.
प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ पातळीवरील अधिकारी स्वतःला सहकारी किंवा इतर कर्मचाऱ्यांपासून वेगळं दाखवण्यासाठी हिरव्या शाईचा पेन करतात.
महत्त्वाच्या पदावरील अधिकारी यांच्या हिरवी शाई वापरण्यामागं म्हणजे स्वाक्षरीची नक्कल करणं कठीण जातं.
सरकारी कार्यालयात हिरवी शाही वापरण्याचं मुख्य उद्देश अधिकारी दर्जा, प्रामाणिकपणा आणि हस्ताक्षर सुरक्षा या तीन गोष्टींना प्राधान्य देणं आहे.
हिरव्या शाईचा कार्यालयीन कामकाजातला वापर हा सुरक्षा आणि अधिकाराची जाणीव करुन देणारा आहे.
सरकारी कार्यालयात प्रत्येकाला काही नियम आणि आचारसंहिता पालन गरजेचं असतं. यात अगदी छोट्या गोष्टींपर्यंत लक्ष दिलं जातं.