IAS Yogesh Patil : पहिल्याच प्रयत्नात आयपीएस अन् दुसऱ्या प्रयत्नात आयएएस, जाणून घ्या योगेश पाटलांची यशोगाथा...

Rashmi Mane

स्वप्न सत्यात

दरवर्षी लाखो उमेदवार या परीक्षेला बसतात पण काही मोजकेच उमेदवार त्यांच्या स्वप्नांना सत्यात उतरवू शकतात.

योगेश पाटील

अशीच एक कहाणी आहे महाराष्ट्रातील योगेश पाटील यांची, ज्यांनी ही परीक्षा दोनदा दिली आणि दोन्ही वेळा यश मिळवले.

पुण्याचे रहिवासी

योगेश पाटील हे पुण्याचे रहिवासी आहेत. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर योगेश यांनी अभियांत्रिकीची पदवी घेतली.

रणनीतीनुसार अभ्यास

पदवीच्या काळातच त्यांनी प्रशासकीय सेवेत रुजू होण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्यांनी चांगली रणनीती आखून अभ्यास सुरू केला.

पहिला प्रयत्न

योगेश यांनी 2018 मध्ये पहिल्याच प्रयत्नात 201 रँक मिळवला. त्यानंतर त्यांची आयपीएससाठी निवड झाली. मात्र, त्यांना आयएएस अधिकारी व्हायचे होते.

दुसरा प्रयत्न

'आयएएस' अधिकारी होण्यासाठी त्यांनी पुन्हा यूपीएससी परीक्षा दिली. शेवटी, जिद्द आणि मेहनतीमुळे 2019 च्या परीक्षेत दुसऱ्या प्रयत्नात 63 वा क्रमांक मिळविला.

योगेश यांचा विश्वास

'परीक्षेत यश मिळवण्यासाठी तुमची पार्श्वभूमी आणि तुमची भाषा याचा काही फरक पडत नाही', असा योगेश यांचा विश्वास आहे.

अभ्यासाची रणनीती

योगेश नवीन उमेदवारांसाठी नेहमी सांगतात की, तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार रणनीती तयार करू शकता. ज्या विषयांची तुम्हाला गरज आहे अशाच विषयांच्या नोट्स तयार करा. अभ्यासासोबतच नियमित रिव्हिजन करा आणि मॉक टेस्ट द्या'.

Next : मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगेंचा मेणाचा पुतळा, पाहा खास फोटो !

येथे क्लिक करा