Rashmi Mane
इंटेलिजन्स ब्युरो (IB) मध्ये भरती ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर पदांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे.
गृह मंत्रालयाच्या अंतर्गत इंटेलिजन्स ब्युरो (IB) मध्ये ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर (JIO) पदासाठी भरती निघाली आहे.
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 28 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. त्याचबरोबर या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2025 आहे.
या भरती मोहिमेत एकूण 394 पदे भरली जाणार आहेत.
इलेक्ट्रॉनिक्स / दूरसंचार / कॉम्प्युटर सायन्स / आयटी / भौतिकशास्त्र / गणित या विषयांमध्ये डिप्लोमा किंवा पदवी असणे आवश्यक.
या भरतीसाठी उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे व कमाल 27 वर्षे असणे आवश्यक आहे.
mha.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जा. त्यानंतर नोंदणी करा आणि
अर्जाचा फॉर्म भरा. त्यानंतर सबमिट करून प्रिंट घ्या.
अर्ज फक्त ऑनलाइन गृह मंत्रालयाची अधिकृत वेबसाइट – mha.gov.in वर कराल.